कौतुकास्पद…! आधी देशासाठी पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, आणि नंतर दिला बाळाला जन्म.

प्रसूतीच्या काही तास अगोदर पर्यंत काम करून देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर लढण्यासाठी कोरोनाच्या निदानाचे किट तयार करून नंतर आपल्या मुलाला जन्म देण्याची घटना समोर आली आहे. विषाणूतज्ञ मीनल भोसले यांनी आपल्या कार्यातून सर्वात पहिले देशसेवा महत्वाची आहे हे दाखवून दिले आहे विषाणूतज्ज्ञ मिनल भोसले मायलॅब या फार्माकंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमनेच भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लावला आहे.

मायलॅबची कोरोना किट ही केवळ दोन ते अडीच तासांमध्ये संबंधित नमुना कोरोना पॉझिटीव्ह आहे की नाही याचा रिपोर्ट देते. परदेशातून मागवलेल्या आणि सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या किट्सला हाच रिपोर्ट द्यायला साधारण 6 ते 7 तास लागतात, अशीही माहिती मिनल भोसले यांनी दिली आहे. या किटला ‘पॅथो किट’ असं नाव देण्यात आलं आहे. या किटची निर्मिती 6 आठवड्यांच्या विक्रमी कमी वेळात केली आहे. सामान्यपणे यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो. यावर बोलताना मिनल म्हणतात, “हा एक आणीबाणीचा काळ होता. त्यामुळे या काळात मी आव्हान म्हऊन हे काम करण्याचं ठरवलं. मला माझ्या देशासाठी काही योगदान द्यायचं होतं. माझ्या 10 सहकाऱ्यांच्या टीमने हे काम यशस्वी केलं.” प्रसुतीच्या 1 दिवस आधीच (18 मार्च) त्यांनी या कोरोना किटचं काम पूर्ण करुन त्याच्या मान्यतेसाठी ते राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी) पाठवलं. याआधी मिनल यांच्या टीमने पूर्ण मेहनत घेऊन संबंधित किट सर्व निकषांवर सिद्ध होईल याची काळजी घेतली. त्यासाठी अनेक चाचणी घेण्यात आल्या होत्या. यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्थेने देखील ही किट 100 टक्के निकष पूर्ण करत असल्याचं सांगत त्याला मान्यता दिली.

उपमुख्यमंत्री मोहदय बारामतीकरांना आवरा, बारामतीत संचारबंदीसाठी तैनात दहा पोलिसांना मारहाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *