कोसंबी येथे पार पडले रक्तदान शिबीर, ३७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तरी शासनाकडून रक्तदान करण्याचे वेळोवेळी आवाहन केल्या जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मूल तालुक्यातील कोसंबी येथे ग्रामपंचायत कोसंबी, सा. फुले सार्वजनिक वाचनालय कोसंबी, गावातील युवक मंडळ व कोसंबी येथील शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराला गावकर्यां्कडून चांगला प्रतिसाद मिळाला असून गावातील ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर चालू असतांना  संवर्ग विकास अधिकारी कपिल कलोडे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. सामाजिक जाण आणि जबाबदारीची जाणीव गावातील युवकांना असून त्यांच्या या उपक्रम केल्या बद्दल गावातील युवक व शाळेचे कौतुक केले. जिल्हा रक्त संक्रमण पेढी, ग्रामीण रुग्णालय चंद्रपुर यांच्या टिमने समाजपयोगी उपक्रम पार पाडल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

सदर रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी गावातील सरपंच संगीता ताई वाढई, उपसरपंच रामभाऊ मोहूर्ले, ग्रामसेवक सूरज आकणपल्लीवर, मुख्याध्यापक प्रशांत गरलेवार, सचिव नागेश मोहूर्ले, अध्यक्ष दुर्गा चहारे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *