कोरोना संक्रमित रुग्ण रुग्णालयातून पसार, प्रशासनाचे धाबे दणाणले.

कोरोनाच्या संकटाशी देश लढत आहे. कोरोंनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. भारतात कोरोना पॉजिटिव रुग्णांची संख्या हजारावर पोहचली असून ८६ रुग्ण बरे होऊन परत आपल्या घरी गेले आहे. परंतु कोरोना बाधित काही रुग्ण पळून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहे. असाच एक प्रकार इंदौर मध्ये घडला असून एमआरबीटी रुग्णालयातील उपचार घेत असलेला कोरोना बाधित रुग्ण तेथील सुरक्षा व्यवस्था व पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. रुग्णालयातील पसार झालेला हा ४२ वर्षाचा असून तो रुग्णालयातून पळल्याने मोठी खळबळ उडाली होती.
रूग्णाला शोधण्यासाठी पोलिस प्रशासन व डॉक्टरांना चांगलीच दमछाक झाली. या रूग्णाला पकडण्यासाठी तब्बल ५ तास लागले. संबंधित रूग्णाला पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने आयोग्य विभागाने सहकार्य न केल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *