कोरोना विषाणू नैसर्गिक नसून लॅबमध्येच तयार झाला. नितीन गडकरी

सर्व जगात सध्या कोरोना ने धुमाकूळ घातली असून संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला आहे. तरी मात्र यावर अजूनही लस निघाली नाही. संपूर्ण जग कोरोनाच्या औषधावर संशोधन करत आहे. मात्र अजून तरी त्यांना यश मिळाले नाही.
कोरोनाचा प्रसार चीनमधील वुहान शहरातून झाला असून अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कुठून माणसात झाला याबाबत स्पष्टता नाही. चीन कडून कोरोना विषाणू प्राण्यांमधून आल्याचे सांगले जात आहे. मात्र त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस चीन मधील लॅब मध्ये झाला असून त्याचे अमेरिकेकडे पुरावे असल्याचा दावा केला.
आता त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार मधील कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले की “मला माहिती आहे की हा विषाणू नैसर्गिक असता तर शास्त्रज्ञांना त्याबद्दल माहिती झाले असते. लॅबमध्ये तयार केलेला हा विषाणू आहे.”  त्याच बरोबर त्यांनी आपल्याला कोरोना बरोबर जगण्याची कला समजून घ्यावी लागेल. हा नैसर्गिक विषाणू नाही. हा एक कृत्रिम विषाणू आहे आणि आता जगभरातील देश त्याच्या लसीच्या शोधात गुंतले आहेत. आत्तापर्यंत ही लस उपलब्ध झालेली नाही, परंतु लस लवकरच येईल व त्यानंतर ही समस्या सुटेल अशी अपेक्षा आहे. असे देखील यावेळी म्हटले.
नितीन गडकरी यांची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे कारण अमेरिका पहिलेपासून चीन नी हा व्हायरस पसरविण्याचा आरोप करत आहे. अमेरिकी मंत्रिमंडळाला कोरोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली याची चौकशी करायची इच्छा आहे त्यामुळेच नितीन गडकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *