कोरोना रुग्णांना नातेवाईकांना भेटता येणार, रुग्णांना भेटण्यासाठी विशेष जागा करणार

संपूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त करून सोडले असून एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत होता त्यामुळे कोरोना रुग्णालयांत कोरोनाबाधिता शिवाय इतर कोणत्याही नातेवाईकांना प्रवेश देण्यात येत नव्हता. आता मात्र नातेवाईकांना कोविड रुग्णालयात जाता येणार आहे. रुग्णालयात बोलण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. “रुग्णालयात एक जागा ठेवावी जिथे रुग्ण आणि नातेवाईकांना बोलता येईल. तसंच आयसीयूमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचेही आदेश दिले आहेत.” असं देखील टोपे यांनी सांगितलं आहे.

रुग्णवाहिकांबाबत मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तक्रारी येत होत्या. अर्धा किलोमीटरसाठी 5  ते 8 हजार रुपये आकारले जातात.  त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायच्या त्याचा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेतील. त्यापेक्षा जास्त दर घेतला तर परवाना रद्द करण्याबरोबर गुन्हा दाखल केला जाईल. ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर लावला तर लोक जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करू शकतात, असं टोपे म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र

संस्थात्मक अलगीकरण अनेक ठिकाणी गांभीर्याने केलं जात नाही, त्यामुळे काही ठिकाणी केसेस वाढतायत,असंही ते म्हणाले. प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. 10 पैकी 9 रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होतोय. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरू करतोय, असंही ते म्हणाले.

हेही वाचा 
↓↓

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *