कोरोना भीती नको काळजी हवी!कोरोना म्हणजे काय?
विषाणूजन्य कोरोना मानवासह प्राण्यांमध्येही आढळतो. सामान्यपणे मानवामध्ये आढळणारा कोरोना आजार श्‍वसनाशी संबंधित असून, अनेक दिवस सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची लक्षणे आहेत. यापूर्वी या प्रकारातील मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मर्स) आणि सिव्हियर ॲक्‍युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) या आजारांनी डोके वर काढले होते. सध्या जगभर पसरलेल्या कोरोना या विषाणूजन्य आजाराला ‘कोविड-१९’ असेही म्हणतात.

Corona
गैरसमज असेही..

हँड ड्रायर’ कोरोनाचा विषाणू रोखू शकते?
उत्तर : नाही, हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. ते धुतल्यानंतर
तुम्ही ते कशाने कोरडे करता, याला फारसे महत्त्व नसते.

अतिनील किरणांचे दिवे कोरोनाच्या विषाणूंना मारतात का?
उत्तर : हाताच्या निर्जुंतुकीकरणासाठी या किरणांचा वापर करू नये; कारण त्यामुळे
त्वचाविकार बळावण्याचा धोका असतो.

कोरोनाबाधितांची ओळख पटविण्यात थर्मल स्कॅनर कितपत उपयोगी ठरतो?
उत्तर : विषाणूच्या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल, तर त्याची ओळख पटू शकते. पण, संबंधित व्यक्ती आजारी नसेल किंवा तिला तापही आलेला नाही अशा व्यक्तीमधील संसर्ग ओळखता येत नाही. सर्वसाधारणपणे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला ताप येण्यासाठी किंवा ती आजारी पडण्यासाठी दहा दिवसांचा अवधी लागतो.

पाळीव प्राण्यांपासून विषाणूचा प्रसार होतो का?
उत्तर : सध्यातरी या प्राण्यांपासून विषाणूचा प्रसार होत असल्याचे दर्शविणारे कोणतेही ठोस पुरावे संशोधकांच्या हाती लागलेले नाहीत. पण, या प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुणे कधीही चांगले.

तिळाच्या तेलामुळे संसर्ग थांबतो का?
उत्तर : नाही, हे तेल नव्या कोरोना विषाणूचा सामना करू शकत नाही

लसूण खाल्ल्याने संसर्ग कमी होतो का?
उत्तर : लसणामध्ये आरोग्याला पूरक असे बरेचसे घटक असतात; पण ते या विषाणूला रोखू शकत नाहीत.

कोरोना विषाणूवर औषध आहे काय?
उत्तर : सध्या तरी नाही.

भारताला धोका का?
उत्तर : दाट लोकवस्ती, विस्कळित आरोग्य यंत्रणा, स्थलांतराचे अधिक प्रमाण यामुळे धोका आहे.

बचाव कसा करावा?
कोरोना संसर्गजन्य आजार असून तो झपाट्याने पसरत आहे. चीनमध्ये उमग झालेला कोरोना आता भारतात आणि पुण्यातही पोचला आहे. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने पुरेशी काळजी घेणे आवश्‍यक आहे. पुढील उपाययोजना केल्यास कोरोनापासून आपण बचाव करू शकतो:
ठराविक वेळाने तुमचे हात शक्यतो साबणाने अथवा हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. साबणाचा पुरेसा फेस होईल, याची काळजी घ्या.
खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तींपासून इतर व्यक्तींनी किमान एक मीटर (तीन फूट) अंतर दूर राहावे.
हात न धुता डोळे, नाक किंवा तोंडाला लावू नये. विषाणूबाधित हात डोळे, नाक किंवा तोंडाला लावल्यास त्याची बाधा होण्याची शक्‍यता असते.
श्‍वसनावाटे बाधा होत असल्याने खबरदारी म्हणून मास्क, हॅण्डग्लोव्हजचा वापर करावा. एन-९५ मास्कमुळे विषाणूजन्य आजारांपासून बचाव करता येतो.सर्दी, खोकला, ताप असल्यास शक्‍यतो घराबाहेर पडू नये. तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.कोरोनाबाधित परिसरातून आलेल्या लोकांनी घ्यावयाची काळजी
चीन, जपान, कोरिया, इटली आदी कोरोनाबाधित देशांमधून आलेल्या लोकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्‍टरांची भेट घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. सेल्फ आयसोलेशन (व्यक्तिगत विलगीकरण) करून घ्यावे. किमान १४ दिवसांपर्यंत इतर लोकांच्या संपर्कात न येण्याची काळजी घ्यावी.

छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात गुजरात अग्रेसर


महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *