कोरोना इफेक्ट…! विदर्भातील शेतकरी हवालदिल, कोरोनामुळे शेतातील पीक आहे घरी पडून.

संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉक डाऊन घोषित करण्यात आले असून त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे याचा परिणाम विदर्भातील शेतकऱ्यांवर झाला आहे. कारण दरवर्षी एप्रिल महिन्यात महिन्यात मालाला चांगला हमीभाव मिळतो म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी त्यांचा माल विकला नाही. अचानक देशावर कोरोनाचे संकट आल्यामुळे देशात लॉक डाऊन घोषीत करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण माल घरीच पडून आहे. जागतिक व स्थानिक बाजारपेठा कोंडीत सापडल्या असून आता काही ठिकाणी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे मात्र सीसीआय व राज्य कापूस पणन महामंडळ अगदी संत गतीने कापूस खरेदीचे काम करत आहे. त्यात कापूस विक्रीसाठी ऑनलाईन करून आपला नंबर येत पर्यंत वाट पाहायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. थोडा जास्त भाव मिळेल या आशेने एप्रिल महिन्यापर्यंत कापूस ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना आता हमीभाव ५४०० मिळणार की नाही ? याची चिंता लागली आहे. हमीभावात कापूस खरेदी करायला खाजगी व्यापारी तयार नाहीत. खाजगी व्यापारी अगदी कवडीमोल भावाने कापूस खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

आता शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली असून पुढील हंगामासाठी शेतीला तयार करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यातच साध्या देशात चालू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठी शेतीसाठी लागणाऱ्या सर्व साहीत्य मिळणार का नाही ही देखी‌ल चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. खरीपाची पेरणी महिनाभरावर आली आहे. मात्र, रब्बीचा माल विकलाच गेल्या नसल्याने खरिपाच्या पेरणीसाठी त्याच्याकडे पैसाच नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. माल विकला गेला नाही तर बॅकेचे कर्ज कसे भरायचे ? पुढच्या हंगामासाठी बियाणे कसे आणायचे असे असंख्य प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *