कोरोनावर मात करण्यासाठी वर्ल्ड बँक कडून भारताला मिळणार सर्वाधिक निधि.

सध्या संपूर्ण जगत कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे देशातील सर्व जनजीवन ठप्प झाले असून आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आता वर्ल्ड बँक भारताला सर्वाधिक निधि देणार आहे. कोरोना व्हायरस वर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला एक अब्ज डॉलर आपत्कालीन अर्थ सहायत्ता निधीसाठी मंजूरी दिली आहे. वर्ल्ड बँकेच्या आपत्कालीन निधीतून पहिल्या टप्प्यात जवळपास २५ देशांची मदत केली जाणार असून ४० पेक्षा जास्त देशांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहे.
वर्ल्ड बँक आपल्या आपत्कालीन निधीतून सर्वाधिक निधि भारताला देणार आहे. जो एक अब्ज डॉलर असणार आहे. वर्ल्ड बँकेने सांगितले की “ भारतात एक अब्ज डॉलरच्या अर्थ सहाय्यातून कोरोंनावर मात करण्यासाठी चांगले स्क्रिनिंग, कोरोनाग्रस्थांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, व्यतिगत सुरक्धा उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे.
वर्ल्ड बँकेने भारताव्यतिरिक्त, पाकिस्तानसाठी २० कोटी डॉलर, अफगाणिस्तान साठी १० कोटी डॉलर श्रीलंकेसाठी १२.८६ डॉलर, मालदिवसाठी ७३ लाख डॉलरची अर्थ सहाय्यता केली आहे. 

पंतप्रधान मोदींचा संदेश, कोरोनाचा अंधार दूर करण्यासाठी ५ एप्रिलला दिव्यांचा उजेड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *