कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र घेणार केरळची मदत.

महाराष्ट्रातील कोरोंनाबाधितांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. सध्या राज्यातील रुग्णांची संख्या ५० हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा वाढती संख्या लक्षात घेता आपल्याला जास्ती जास्त प्रशिक्षित डॉक्टर्स आणि नर्सेसची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आता राज्य सरकारने केरळला प्रशिक्षण डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची विनंती केली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ टी. पी. लहाने यांनी यासंदर्भात केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना विनंती पत्र लिहलं आहे.

केरळने योग्य नियोजन करून कोरोना आटोक्यात आणला आहे. केरळ पॅटर्नची देशभर चर्चा सुरू आहे. या केरळ पॅटर्नमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसना प्रशिक्षित करण्यात आलं होतं. यातीलच ५० प्रशिक्षित डॉक्टर आणि १०० नर्सेस केरळने मुंबईत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाठवावेत, अशी विनंती या पत्रात लहानेंनी केली आहे. केरळकडे ही विनंती करताना या डॉक्टरांना आणि नर्सेसना राज्य सरकार वेतनही देणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांना राज्य सरकार दरमहा ८० हजार, तर एमडी, एमस डॉक्टरांना दरमहा २ लाख रुपये आणि प्रशिक्षित नर्सेसना दरमहा ३० हजार रुपये वेतन देणार आहे. त्यांच्या राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. त्यांना पीपीई किट इतर औषध राज्य सरकार पुरवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील केरळ पॅटर्न राबविण्यात येण्याची शक्यता आहे. जर केरळ पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी झाला तर महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा लवकरच कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोठी बातमी…! सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *