कोरोनाने अमेरिका हादरली, ११ भारतीयांचा देखील मृत्यू.

कोरोनाने सध्या संपूर्ण जगात थैमान घातले आहे. पाहिले चीन त्यानंतर इटली, स्पेन नंतर आता अमेरिकेत कोरोणाने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस मुळे अमेरिका आता मोठ्या भीषण परिस्थितीचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखायचा कसा ? हा प्रश्न तेथील प्रशासनासमोर मुख्य आहे

आता अमेरिकेतील कोरोनाच्या प्रादुर्भावचा तेथे असणाऱ्या भारतीयांवर देखील होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ११ भारतीयांचा मृत्यू झाला असून १६ भारतीयांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहे. अमेरिकेत आता पर्यंत १४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चार लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

अमेरिकेकडून भारताचे आभार. “तुमचे उपकार विसरणार नाही”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधांची मागणी केली होती. ती भारताने पुरविण्यास तयारी दाखविल्याने अमेरिकेने कृतज्ञता व्यक्त केली आहे . भारताने औषध निर्यातीची बंदी घातली होती परंतु हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन ची मागणी बाकीच्यांना आवश्यक असल्याने भारताने निर्यात बंदी उठवून सर्वांची तसेच अमेरिकेची मदत केली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून भारताचे आभार व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *