कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या मोठ्या घोषणा.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही, तसेच पुढील तीन महिन्यापर्यंत कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले असता कोणताही चार्ज लावण्यात येणार नाही. ATM धारक कितीही वेळा पैसे काढू शकतात. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. करदात्यांना मोठा दिला असून प्राप्तीकर,जीएसटी सह अन्य आर्थिक कामकाजासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच केंद्र सरकार तर्फे भरीव पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग ठप्प झाले असून आर्थिक आघाडीवर दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन व केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

करविषयक विवादांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने विवाद से विश्वास तक ही योजना नुकतीच जाहीर केली आहे. सदर योजनेसदेखील ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपन्यांना दिलासा देत संचालक मंडळाच्या (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मिटींग) बैठका पुढील साठ दिवसांसाठी टाळण्याची मुभा देण्यात आली आहे. आयात आणि निर्यातीवर परिणाम होऊ नये आणि व्यापार ठप्प होऊ नये , यासाठी २४ तास कस्टम व एक्साइज क्लिअरन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.डेबिट कार्डधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पुढील ३ महिन्यांसाठी म्हणजे ३० जून पर्यंत एन्य बँकांच्या एटीएम सेवेचा वापर केल्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे बँक खात्यात किमान रक्कम (मिनीमम बँलन्स) ठेवण्याची अटदेखील ३० जूनपर्यंत शिथील करण्यात आली आहे. मात्र , गरज असेल तरच बँकेत जावे आणि जास्तीतजास्त व्यवहार ऑनलाईन बँकींक अथवा युपीआयद्वारे करण्यावर भर द्यावा , असे आवाहन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केले आहे.जीएसटी रिटर्नसाठीदेखील ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मार्च , एप्रिल आणि मे महिन्याचे जीएसटी रिटर्न भरण्यासाठी आता ३० जून पर्यंतक मुदत आहे. त्याचप्रमाणे पाच कोटी व त्यापेक्षी कमी वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांना व्याज , दंड आणि विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे , तर पाच कोटी व त्याहून जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांना १५ दिवसांसाठी विलंब शुल्क , दंड आणि व्याज माफ असेल आणि त्यानंतरही केवळ ९ टक्के व्याज आकारणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जीएसटी भऱपाईसाठीदेखील ३० जून पर्यंत मुदतवाढ आहे. यामुळे छोट्या व मध्यम उद्योगांना मोठा लाभ होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

कोरोना इफेक्ट…! त्याने चक्क १८६ किलोमीटर अंतर सायकलने केला प्रवास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *