कोरोनाच्या पार्श्वभूमीवर’ एलआयसी’ कडून विमाधारकांसाठी मोठ्या घोषणा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एलआयसी कडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. एलआयसीने मार्च व एप्रिल महिन्यातील विम्याचे हफ्ते भरण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. तसेच कोरोंनामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास भरपाईचा दावा स्वीकारून त्यांच्या वरसला तात्काळ रक्कम दिले जाईल असे देखील म्हटले आहे.

“जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” अस म्हणणार्‍या  एलआयसी ने सध्या देशात चालू असलेल्या परिस्थितीत देखील आपल्या विमाधारकांची साथ सोडली नाही. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर विमाधारकांना दिलासा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ज्यांना आपल्या प्रिमियमचं पेमेंट या काळात करायचं आहे त्यांच्यासाठी देखील एलआयसीने सोय केली आहे. नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम, फोनपे, गूगल पे, भीम, यूपीआय या माध्यमातून ज्यांना प्रिमियम भरायचा आहे, ते भरु शकतात. तसेच आयडीबीआय बँक आणि अॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये आणि ब्लॉक स्तरावरील सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) रोख रकमेद्वारे देखील प्रिमियम भरता येऊ शकते. विम्याचे हप्ते भरताना एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. आवश्यक माहिती संकेतस्थळावर दिल्यास विम्याचा हप्ता भरता येईल. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अॅ्प डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांना दिलासा…! चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *