कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरदोना खुर्द येथील युवकांनी केले रक्तदान.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यामध्ये  रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.  त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून रक्तदान करण्यासाठी आव्हान केले जात आहे. कालच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील विविध संस्था व समाजकार्य करणाऱ्या संस्था रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तपेढीचां पुरवठा वाढवत आहे. रक्तदान करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला हरदोना खुर्द येथील युवक व युवतींनी प्रतिसाद देऊन हरदोना खुर्द येथे आज दिनांक २३-०५-२०२० ला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराला गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून गावातील ३६ युवकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या रक्तदान शिबिरात डॉ स्वप्नील चांदेकर -रक्त संक्रमण अधिकारी, श्री. पंकज पवार-समाजसेवा अधीक्षक,श्री जयसिंग डोंगरे -प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अर्पणा रामटेके-प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्री संदीप बडगे-रक्तपेढी सहाय्यक तंत्रज्ञ ,मोहनिश मुद्दमवार -अधिपरिचारक, श्री लक्ष्मण नगराळे -परिचर, श्री रूपक जुमडे -परिचर, श्री रुपेश घुमे -वाहनचालक उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच श्री शंकर टेकाम, उपसरपंच रामचंद्र सुर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश जांबुळकर, ग्रामसेवक अरुण मेश्राम, तसेच गावातील प्रवीण थाटे, अक्षय टेकाम, चेतन पिंपळशेंडे, यादव ठेंगणे, अर्चना झाडे, मोहिनी झाडे, विजयालक्ष्मी बोबडे, अभिलाषा बोबडे, व इतर युवकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *