कोरोनाचा फटका, चंद्रपूरतील शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून याचा फटका सर्व क्षेत्रांत दिसून येत आहे. कोरोनामुळे सर्व व्यवसाय सध्या ठप्प असून महाविद्यालये सुद्धा बंद करण्यात आली आहे. याचाच फटका आता चंद्रपूरतील शासकीय रक्तपेटीवर बसण्याचे संकेत दिसून येत आहे. रक्तदान करणार्यांयची संख्या खूप कमी झाली असून शासकीय रुग्णालयात रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे. दररोज ४० ते ५० बोटल रक्ताची मागणी होत असून केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करत आहे. त्यामुळे रक्तदान करणे गरजेचे आहे. शासकीय रक्तपेढी सोबतच खाजगी रक्तपेढिंची अवस्थाही बिकट आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे रक्तदातेही रक्तदान करण्यास घाबरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत आहे.

रक्तदान करण्याचे आवाहन.

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर रक्तदात्यांची आवश्यकता असते. कारण उन्हाळ्यात अपघात व इतर आजारांसाठी मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मात्र याच दिवसांत रक्तदान कमी होते त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे. तुम्ही केलेल्या रक्तदानामुळे दुसर्यााचा जीव वाचू शकतो असे आवाहन चंद्रपुर मेडिकल कॉलेजच्या ब्लड बँक अधिकार्यांधनी केले आहे.   

कौतुकास्पद…! कुटुंबाचे ओझे पेलत ती झाली ‘पोलिस उपनिरीक्षक’.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *