केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले दुसऱ्या लॉकडाऊन चे मार्गदर्शक तत्वे.

केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाउन वाढविण्याच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारच्या गृहखात्याने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं कठोर पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात आली आहेत.

  •  सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक आहे.
  •  कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये.
  • आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा.
  • लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *