किर्गिस्तानमध्ये अडकले महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थी.

सध्या कोरोनामुळे जवळपास सर्व देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहे. त्याचबरोबर हवाईवाहतूक देखील बंद आहे. त्यातच  रशियामधील किर्गिस्तान येथील ओष विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थी तिथेच अडकले आहे, त्यांना आता आपल्या मायदेशी परतण्याची ओढ लागली असून लवकरात लवकर आम्हाला मायदेशी आणण्यात यावे यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.
सदर विद्यार्थ्यांना एका वस्तीगृहात ठेवण्यात आले असून त्यांचा अन्नपदार्थाचा साठा देखील संपण्याच्या मार्गावर आहे. किर्गिस्तान सरकारने लॉकडाउन घोषित केले असल्याने विद्यार्थी बाहेर पडू शकत नाही आहे व बाहेरील दुकाने देखील बंद असल्याने त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचा पेच निर्माण झाला आहे. एखाद्याची तब्बेत बिघडलीच तर काय करावे त्याच्यावर कसे औषधउपचार करावे हाही पेच निर्माण झाला आहे. बर्‍याच विद्यार्थ्यांचे रीचार्ज संपल्यामुळे त्यांच्या आपल्या पालकांसोबत संपर्क तुटला आहे, त्यामुळे पालकांचा देखील जीव टांगणीला लागला आहे. किर्गिस्तान सरकारकडून त्यांना मायदेशी पाठविण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आता केवळ मुंबई विमानतळावर विमान उतरविण्यासाठी राज्यसरकार व केंद्र सरकार यांच्या परवानगीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे अशी मागणी त्यांचे पालक व डॉ. दिपेश रसाळ यांनी केली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *