का आहे विदर्भातील शेतकर्‍यांना आधुनिक शक्ति देण्याची गरज ?

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/
Instagram:-  https://t.me/chandatobanda

एके काळी पांढरे सोने म्हणजे कापूस व त्याला जोड संत्री करिता प्रसिद्ध असलेला विदर्भ प्रदेश. विदर्भातील संत्री ची ख्याती देशा विदेशात पसरली होती व विदर्भाला संत्रांचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधले जात होते. परंतु आज परिस्थिति वेगळी निर्माण झाली आहे विदर्भाला शेतकरी आत्महत्या करणारा प्रदेश म्हणून ओळखले जाते. विदर्भातील शेतकरी हे खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे, याचे कारण म्हणजे पारंपरिक पद्धतीने आजही विदर्भात शेती केली जाते. पारंपरिक शेती ही खूप खर्चिक असून त्यामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते. व पारंपारीक शेतीमध्ये जास्त उत्पादनही होत नाही. त्यामुळे शेतकर्यांतची दिवसे न दिवस अधोगती होत आहे. विदर्भातील बहुतांश शेतकरी हे कोरडवाहु शेती करतात त्यांच्या शेतीला कुठलीही पाण्याची सोय उपलब्ध नाही. उर्वरित महाराष्ट्रचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांकच्या शेत्या बागायती आहे. याचे कारणही तसेच आहे तेथील शेतकर्यां ना सिंचनाच्या सर्व सोयी उपलब्ध आहे. तेथील प्रतींनिधींनी आपल्या भागातील शेतकर्यां साठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहे. तेथील आधुनिक तंत्रज्ञानाचा तेथील शेतकरी वापर करतात. करतात कारण ते आर्थिक बाबतीत भक्कम आहे. परंतु विदर्भाच्या बाबतील असे नाही. याचे कारण म्हणजे विदर्भातील शेतकर्यांरकडे सिंचंनाच्या विशेष सोयी नाही. व विदर्भातील शेतकर्याीसाठी त्यांच्या प्रतींनिधींनी काही व्यवस्था उपलब्ध करून ठेवली नाही.
                              विदर्भातील शेतकर्‍यांची  आर्थिक स्थितित सुधारणा करायची असेल तर शेतकर्यां ना आधुनिक तंत्रज्ञांनाची जोड देणे गरजेचे आहे. व  शेतीत अधिक उत्पादन करण्याशिवाय दूसरा पर्याय नाही. विदर्भातील जमिनी या पिकाउ जमीनी आहे त्यांना जर आवश्यक सोयी मिळाल्या तर विदर्भ पुन्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. जर एकट्या विदर्भाचा विचार केला तर विदर्भात नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे. महाराष्ट्रातील एकूण ९ पवार प्लांट पैकी ४ पावर प्लांट हे एकट्या विदर्भात आहे. खनिज क्षेत्रात विदर्भ समृद्ध आहे. विदर्भात कोणत्याच गोष्टीची कमी नाही. तरीही विदर्भातील शेतकरी मात्र  आजही मागे पडत आहे याचे कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञांनाची कमतरता म्हणून विदर्भतील शेतकर्यां ना शक्ति देणे गरजेचे आहे.

वेगळा विदर्भ हा उत्तम पर्याय.

विदर्भातील शेतकर्यांयना सर्व सुविधा द्यायच्या असतील आणि विदर्भातील शेतकर्यांलची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची असेल तर वेगळा विदर्भ हा एक उत्तम पर्याय आहे. वेगळा विदर्भ झाल्यास विदर्भातील शेतकर्यांिच्या सिंचनासाठी जास्तीत जास्त पैश्याची तरतूद करून विदर्भातील जमिनी ओलीताखाली आणता येईल. त्यामुळे शेतकर्यां चे उत्पन्न वाढून त्यांना आधुनिक शेती उपकरणे वापरण्याचा पर्याय मिळेल. जमिनी सिंचंनाखाली आल्यामुळे त्यांना भाजीपाल्या सारखी नगदी पिके घेता येईल.
                   शेती बरोबरच विदर्भ वेगळा झाल्यामुळे विदर्भातील सर्वांनाच फायदा होईल. विदर्भातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होईल. विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. यातून उद्योगधंदे निर्मितीसाठी उद्योगपतींना आकर्षित करता येईल.  त्यामुळे नवनवीन उद्योग येतील बेरोजगारी दूर होईल. रोजगार निर्माण झाल्याने संपूर्ण कुटुंबाला शेतीवर अवलंबून राहावे लागणार नाही . सर्वच बाबींचा विचार केला असता वेगळा विदर्भ झाल्यास सर्वांनाच फायदा होईल.

                                                               जय विदर्भ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *