काय असतील नव्या वर्षात तरुणांसमोर आव्हाने ?

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.

Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/
Instagram:-  https://t.me/chandatobanda

भारत हा युवकांचा देश आहे. भारतात जवळपास ४१ टक्के युवक आहे . त्यामुळे २०२० ह्या नव्या वर्षात युवकांसमोर कोणती आव्हाने असतील ?, युवकांना कसं आपल्यातील कौश्यल्य गुणांना समोर आणता येईल. याबद्दल राजुर्‍यातील युवा कवि आदित्य आवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

   

भारत हा तरुणांचा देश आहे. भारत देशात जवळपास ४१% युवा वर्ग असल्यामुळे २०२० ह्या नव्या वर्षात युवकांसमोर कोणती आव्हाने आहे? युवकांमध्ये असलेल्या कौशल्य गुणांना कशा प्रकारे समोर आणता येईल, याबद्दल राजुर्‍यातील युवा लेखक आदित्य आवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

             मित्रांनो, भारत हा तरुणांचा देश आहे.भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ४१% तरुणवर्ग आहे. विचार केला तर ही बाब भारतासाठी जमेची बाजू आहे परंतु त्याच बरोबर या युवकांसमोर नवनवीन आव्हाने सुद्धा आहेत. त्यांच्यावर नव्या दिवशी नवी जबाबदारी लादल्या जाणार आहे. या नव्या वर्षात युवकांपुढे खूप आव्हाने असतील.कारण, आजची तरुणाई ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल त्यामुळे आज त्यांना पूर्णता परिपक्व होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना नव-नवीन विषयात रुची निर्माण करावी लागणार आहे. जर आज ते एखाद्या विषयात रुची निर्माण करून त्याविषयीची पुस्तके वाचतील तरच उद्याच्या पिढीला त्यांना मार्गदर्शन करणे सोपे होईल. म्हणून आजच्या युवकांचे सर्वात महत्वाचे आव्हान म्हणजे आज त्यांना विविध अनुभव घ्यावे लागतील. काही तरी नवीन काम हाती घ्यावे लागणार आहे,तेव्हाच त्यांना त्या गोष्टीचा अनुभव येईल व पुढे जाऊन भावी पुढील पिढीला आजचे युवक मार्गदर्शन करू शकतील. आजचा विचार केला तर आज देशात खूप समस्या आहेत. काही प्रमाणात त्या कमी झाल्या असल्या तरी बर्‍यापैकी समस्या आहेतच! आजच्या युवकांनी देशातील या समस्यांवर काही तरी उपाय शोधयला हवा जेणेकरून तुम्ही आपली स्वतःची एक ओळख निर्माण करू शकाल व देशातील समस्यांवर उपायही मिळेल. परंतु यासाठी आजच्या युवकांना प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे.
आजचा युवक हा प्रचंड क्रियाशील आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर आज तो नवनवीन शोध लावत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तो आपली नवी ओळख निर्माण करत आहे, परंतु हे सर्व करतांना तो सामाजिक कार्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. युवकांनी सामाजिक कार्यात भाग घेणे खूप गरजेचे आहे. कारण, समाजात आज खूप समस्या आहेत ज्या केवळ युवकांनी सहभाग घेतला तर सुटू शकतील व समस्या सोडविल्या तर समाजात परिवर्तन घडून येऊ शकते,त्यामुळे युवकांनी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन समाजात परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे.
                                                                               तरुण वय हे ज्याप्रमाणे चांगले आहे,त्याचप्रमाणे तरुण वयातच तरुणांना नव-नवीन चांगल्या-वाईट सवयी लागतात. त्यामुळे तरुणांनी स्वतःला वाईट सवयी पासून दूर ठेवलेलेच बरे! कारण या क्रांती घडवून आणणाऱ्या वयात जर वाईट सवयींशी मैत्री झाली तर समोरील संपूर्ण आयुष्य त्याच सवयींमुळे उध्वस्त झाल्यावाचून राहणार नाही व पुढील पिढी एका नव्या आदर्शाला मुकणार हे मात्र नक्की! त्यामुळे आजच्या युवकांनी स्वतः या सवयींपासून दूरच राहायला हवे व त्याचबरोबर आपल्या आजुबाजुच्या युवक मित्रांना वाईट सवयींपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजचा विचार केला तर आजची मुले दारू पिणे,स्मोकिंग यासारख्या वाईट सवयींच्या विळख्यात अडकलेली दिसून येते. येणारी पिढी या वाईट सवयींच्या विळख्यात सापडणार नाही यासाठी आदर्श युवकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

                                 छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराद्य दैवत आहे. शिवाजी महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग आपल्या देशात आहे. त्यामुळे त्यांचे विचार संपूर्ण देशात रुजविणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहचविणे आवश्यक आहे. कारण देशात एकता टिकवायची असेल तर या थोर महामानवांच्या विचारांचा प्रसार होणे आवश्यक आहे.
कारण, फुले-शाहू–आंबेडकर यांचे विचार हेच समाजाला योग्य दिशा दाखवू शकतात. त्याचप्रमाणे तारुण्यात पदार्पण करणार्‍या तरुणांनी समाजाच्या हितासाठी समाजकारणात व त्याच बरोबर राजकरणात येण्याची गरज आहे.कारण राजकरणातूनच समाजातील सर्व घटकांची माहिती मिळते व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडता येते. बर्‍याचदा राजकीय फायद्यासाठी राजकारण्यांकडून युवकांचा वापर केला जातो परंतु युवकांनी त्यांच्या आमिषाला बळी न पडता राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे. तेव्हाच समाजाला अभ्यासू व नवे राजकीय नेतृत्व मिळेल. आजच्या परिस्थितीत नेत्याचा मुलगाच कोणतेही राजकीय ज्ञान नसतांना नेता बनतो आहे. हे कुठे तरी थांबायला हवे व हे थांबविण्याची ताकद आपल्या युवाकात आहे.
                                                   
                                                आजच्या युवकाला प्रारंभी आपले ध्येय निश्चित करावे लागणार आहे. कारण, कोणतेही ध्येय निश्चित न केल्यास प्रगती होणे अशक्य आहे. ध्येयाविणा केलेली वाटचाल ही व्यर्थ ठरते. जर एखादे ध्येय अंगी बाळगले तर ते ध्येय पूर्णत्वास गाठण्यासाठी सतत प्रयत्न करून गगन भरारी घेता येईल व आपल्या राष्ट्रासाठी आपले योगदान देता येईल. आपण केलेले प्रत्येक कार्य हे आपल्या राष्ट्रासाठी उपयोगात यायला हवे ही भावना प्रत्येक तरूणाने आपल्या मनात रुजवली तर सर्वोत्कृष्ट राष्ट्राची निर्मिती करता येईल. आज आपल्या देशात ७० टक्क्याहुन अधिक लोक हे खेड्यात वास्तव्य करतात. आज त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, त्यासाठी तरुणांनी समोर येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता भासली आहे. आज ग्रामीण भागातील व्यवस्था बदलविण्याची जबाबदारी तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. त्याच बरोबर आजच्या विज्ञानाच्या युगात आपली संस्कृती जपण्याचेही कार्य आजच्या युवकांना करावे लागणार आहे. कारण, भारताला संस्कृतीचा खूप मोठा वारसा लाभला आहे. तो वारसा जपण्याची जबाबदारी ही आजच्या युवकांची आहे.


धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *