कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्वींटल १५०० रुपये बोनस जाहीर करा:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

चंद्रपूर, यवतमाळ व विदर्भातील अन्य जिल्ह्यात कापूस खरेदीत फेडरेशन व सीसीआय चे खरेदी करीता राज्य सरकारचे व्यवस्थापन अपयशी ठरले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागला व त्या सर्व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५०० ते २००० रु. कमी दर मिळाला. याची नोंद तिथे जिनिंगला आहे तरी त्या नोंदी प्रमाणे राज्य सरकारने आपले नियोजनात आलेले अपयश मान्य करुन अशा मजबुरीने कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना १५०० रु. प्रति क्विंटल बोनस जाहीर करावा. मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस सरकारने चना खरेदी गोडाऊन अभावी होऊ शकली नव्हती तेव्हा १००० रु प्रति क्विंटल बोनस दिला होता.

कापूस उत्पादकांचे झालेले नुकसान बोनस देऊन भरून काढावे या शेतकऱ्यांनी लॉकडाऊन काळात प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांचे आदेशाचे पालन करून दीड महिना कापूस आपल्या राहत्या घरात खोलीत ठेवला, आता फेडरेशन आणि सीसीआय ची खरेदी सुरू झाली तेव्हा कापूस बाजारात घेऊन गेल्यावर त्यांची खरेदी नियोजनाअभावी फेडरेशन व सीसीआय ने केली नसल्याने कमी दरात खाजगी मध्ये कापूस विकावा लागला ही राज्य सरकार ची चूक आम्ही मानतो म्हणून १५०० रु प्रति क्विंटल बोनस खाजगी व्यापाऱ्यांना विकणाऱ्या  शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ही मागणी माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे.

नवीन हंगामाची सुरवात जवळ आली असून अजूनही शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरीच आहे. त्यामुळे नवीन हंगामात शेती कशी करावी ही गंभीर समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १५०० ते २००० रुपये बोनस जाहीर करावे अशी मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *