‘कर्ज भरायचे की नाही’ ? चालू कर्जधारक शेतकर्‍यांसमोर नवा पेच.

महाराष्ट्र सरकारने मागील महिन्यातच २ लाख पर्यंत थकीत कर्ज असणार्‍या  शेतकर्‍यांना  कर्जमाफी दिली, या कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यावर जमा देखील होत आहे. त्यामुळे २ लाखापर्यंत थकीत कर्ज असणारे शेतकरी आनंदी आहे. मात्र चालू कर्ज असणार्‍या  शेतकर्‍यांना  ५० हजारपर्यंत अनुदान शासन देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु अद्याप याबाबत कोणतीही सूचना शेतकर्‍यापर्यंत आली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चालू असलेले कर्ज भरायचे की थकीत ठेवायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे.

बँकेतील अधिकार्‍यांसोबत बोलले असता त्यांनी पहिले कर्ज भरा त्यानंतर सरकार कडून अनुदान मिळेल असे सांगितले असले तरी शासनाकडून अजूनही कोणतीही माहिती शेतकर्‍यापर्यंत  पोहचली नसल्याने कर्ज भरले तर अनुदान मिळणार काय ? आणि अनुदान कोणाला मिळणार ? त्यात काही निकष असणार काय? असे विविध प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांसमोर कर्ज भरायचे अथवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, कोरोनाग्रस्त व्यक्त केल्या आपल्या भावना,

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *