कर्जमाफीच्या लाभर्थ्यांनी दिले ‘मुख्यमंत्र्यांना’ लेकीच्या लग्नाचे निमंत्रण॰

कालच ठाकरे सरकारने कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये राज्यातील १५ हजार ३५८ लाभर्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. काल कर्जमाफीच्या योजनेचा प्रारंभ करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कोन्फरिंगद्वारे परभणी अहमदनगर, आणि अमरावतीच्या शेतकर्यांंशी संवाद साधला. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या लेकीच्या लग्नाचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, ‘ साहेब, कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होत असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही, तुम्ही लग्नाला या ’ असे आपुलकीचे आमंत्रण त्या शेतकर्‍याने  दिले.

                                                                                            कर्जमाफी प्रक्रिया अवघ्या साठ दिवसांत पूर्ण केल्यामुळे याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या यंत्रणेला दिले आहे. यंत्रणेने चांगले काम केले असून त्यांचे कार्य प्रशंसीय असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी लवकरात लवकर कर्ज मुक्त व्हावे यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपाचा आज राज्यभर ‘धरणे’

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *