करा ‘अशी’ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि मिळवा भरपूर नफा.

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नाव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलो अहो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसबंधी माहिती,मित्रांनो आज आपल्या कडे शेअर मार्केट म्हणजे सट्टा आहे असे समजले जाते, त्याचबरोबर शेअर मार्केटसबंधी विविध गैरसमज आज आपल्यामध्ये निर्माण झालेले दिसून येते. गुंतवणूक करण्यासाठी खूप पैसा लागतो, हे पैसेवाल्यांचे उद्योग आहे तसेच हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे असे समजून सर्वसामान्य लोक मार्केटपासून दूर राहतात. परंतु मित्रांनो जगातील सर्वात 3 रे श्रीमंत असलेले वारेन बफेट हे जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहे. त्यांना जग शेअर बाजाराचे जादूगर म्हणून ओळखतात त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले शेअर वयाच्या 11व्या वर्षी खरेदी केले परंतु ते घाट्यामध्ये त्यांनी विकले. त्यांनतर त्यांनी विविध ठिकाणी गुंतवणूक करून आपली संपत्ती वाढवली २००८ मध्ये ते ६२०० करोड डॉलर चे मालक होते. त्यामुळे तुम्ही पण चांगल्या शेअर मध्ये आपली गुंतवणूक करून आपली संपत्ती वाढवू शकता.
कशी कराल शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ?
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर मार्केट सबंधी ज्ञान असणे आवश्यक आहे, शेअर मार्केट मार्केट कसे चालते याबद्दल माहिती घेऊनच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सुरवात करा म्हणजे नुकसान होणार नाही. ज्या कंपनीचे तुम्ही शेअर तुम्ही घेत असता त्या कंपनीच्या कार्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण त्या कंपनीच्या परफॉर्मन्सवर तुमच्या शेअर ची किंमत अवलंबून असते. म्हणून कोणत्याही कंपनी मध्ये गुंतवणूक करतांना त्या कंपनीची माहिती घेणे आवश्यक असते. त्यानंतर तुम्ही मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला लगेच नफा मिळणार असे नाही तर काही वेळा तुम्हाला नफा मिळवण्यासाठी खूप काळ वाट पहावी लागते. तसेच प्रत्येक वेळी नफा होतोच असे नाही काही वेळी तोटाही सहन करावा लागतो. त्यामुळे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे हमखास नफा मिळवणे असे  होत नाही, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे हे कधी कधी धोकादायक पण ठरू शकते. काही गुंतवणूकदार हवी तशी अर्थ प्राप्ती झाली नाही की लगेच गुंतवणूक काढून घेतात परंतु तेच यशस्वी होतात जे जास्त वेळ देतात. त्यामुळे संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. आपली गुंतवणूक कोणत्या दिशेने जात आहे याची नियमितरीत्या समीक्षण करणे चांगले असते, कारण जर आपल्या शेअर्स वर आपले चांगले लक्ष असेल तर ते आपल्या फायद्याचे ठरते. कारण त्यामुळे कधीकधी आपले मोठे नुकसान होण्यापासून आपण वाचू शकतो.

आज शेअर मार्केट मध्ये गुंतूवणूक करण्यासाठी खूप पर्याय निर्माण केले आहे, म्युचल फंड च्या माध्यमातून देखील तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता. त्याच बरोबर मार्केटमध्ये येणार्‍या नवीन कंपनीचा आयओपी घेऊन त्यामध्ये आपला नफा मिळवू शकता. आज मार्केट मध्ये शेअर बाजाराची माहिती देण्यासाठी विविध संस्था काम करत आहे परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *