कमी पैशात करा ‘हे’ पाच व्यवसाय आणि कमवा महिन्याला ३० हजारापर्यंत…


नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला फालो करा.

      
मित्रांनो सध्या देशात भीषण बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांसमोर नोकरीची खूप मोठी समस्या निर्माण झाली असून नोकरीसाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. ज्या युवकांना स्वताचा व्यवसाय असेल त्यांच्या साठी आज आम्ही कमी लागत मध्ये चालू करता येणारे ५ व्यवसाय घेऊन आलो अहो ज्या माध्यमातून तुम्ही महिन्याला ३० हजार पर्यंत कमावू शकता आणि व्यवसायात आपली ओळख निर्माण करू शकता.
चला तर पाहूया संपूर्ण माहिती.
१1)    चप्पल मेनूफक्चरिंग:-  चप्पल ही आपल्या दैनदीन वापरत येणारी वस्तु आहे त्यामुळे बाजारात चप्पलची मागणी ही नियमित मागणी आहे त्यामुळे चप्पल बनवून ती बाजारात विकणे हा व्यवसाय फायदेशीर असल्याचे दिसून येते. चपल बनवायची मशीन ही १५ हजारापासून ते १ लाख रुपयांपर्यंत किंमतीची आहे.त्यामुळे व्यवसायिकणे आपल्या सोयीनुसार मशीन ची निवड करावी.या मध्ये एक जोडी चप्पल तैयार करण्यासाठी तुम्हाला त्याच्या क्वालिटी नुसार २५ रुपये ते ५० रुपये लागत लागेल. ती चप्पल तुम्ही बाजारात विकून चांगला नफा मिळवू शकता. तुम्ही तुमच्या लगतच्या मार्केट मध्ये असणार्‍या चप्पल विक्री व्यवसायिकांना ठोकीने चप्पल विक्री करून किंवा आठवळी बाजारात जाऊन चप्पल विक्री करू शकता व महिन्याला ३० हजारपर्यंत कमवू शकता.मित्रांनो हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला चांगली मार्केटिंग करावी लागेल. चांगल्या मार्केटिंगमुळेच तुम्ही तुमच्या व्यवसायला मोठे करू शकता.
२2)    शिकवणी वर्ग ( tution ):- जर तुम्ही एखाद्या विषयाचे चांगले अभ्यासक असाल तर शिकवणी वर्ग (tution) हा तुमच्या समोरील चांगला विकल्प आहे. आजकाल ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यन्त शिक्षणाबद्दल चांगली जागृती झालेली आहे व चांगल्या शिक्षणासाठी लोक आपल्या मुलांना शाळेव्यतिरिक्त शिकवणी वर्गाला पाठवतात. त्यामुळे तुम्ही मुलांची शैक्षणिक मदत करू शकता आणि चांगली कमाईपण करू शकता.
३3)    कुकुळपालन:- मित्रांनो भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील जास्तीत जास्त लोक हे शेती हा व्यवसाय करतात. शेती करतांना आज शेतीला जोड व्यवसाय म्हणून कूकुळपालन हा व्यवसाय करून तुम्ही चांगली आमदानी कमवू शकता.
४4)    पेपर प्लेट व कप व्यवसाय:- पेपर प्लेट व पेपर कप निर्मिती हा एक उत्तम व्यवसाय आहे. दिवसे न दिवस पेपर प्लेट व कप ची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागा पासून ते शहरी भागापर्यंत सर्वच ठिकाणी आता पेपर प्लेटचा वापर हा वाढला असून त्याची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्केट मध्ये पेपर प्लेट मशीन ही ६० हजारापासून ते ५ लाख पर्यंत उपलब्ध आहे.

5)     फोटोग्राफी :- फोटोग्राफी हे एक चांगला व वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. साधारणता लग्न सराईत फोटोग्राफी हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो परंतु इतरही वेळी हा व्यवसाय चांगला चालतो.आजचे युग हे सोशल मीडियाचे आहे. सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे फेसबुक,इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप सारख्या प्रोफाइल वर फोटो टाकण्यासाठी फोटोशूट करण्याचा नवा ट्रेंड चालू आहे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *