कंपन्याच्या CSR फंड अंतर्गत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठिकठिकाणी हँड वॉश केंद्र उभारा. मंगेश पाचभाई यांची जिल्हाधिकार्यकडे पत्रा द्वारे मागणी.

प्रतींनिधी,
चांदा टू बांदा यवतमाळ
सध्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना हा रोग पसरला असून प्रत्येक लहान मोठ्या शहरांमध्ये तसेच खेड्यामध्ये सुद्धा कोरोना ची दहशत पसरलेली आहे.झरी -जामनी तालुक्यात अनेक छोटे मोठया कंपन्या आहेत या कंपनीमध्ये बाहेरील अनेक युवक काम करतात तसेच ट्रांसपोर्टसाठी अनेक ट्रक चालक आणि वाहक ये जा करत असतात मात्र त्याच्या तपासणीची कोणतीही व्यवस्था या कंपन्यांना कडून केलेली नाही अडेगाव परिसरातील मुकुटंबन,खडकी,खातेरा,तसेच सभोवतालच्या परीसरात कोरोनानी दहशत माजवलेली आहे.

या सर्व रोगाची लागण रोखण्यासाठी मंगेश पाचभाई यांनी जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना पत्राद्वारे निवेदन दिले की मुकुटंबन मध्ये युद्धपातळीवर काम चालू असलेल्या R.C.C.P.L. सिमेंट कंपनीकडून CSR फंडातून व ईशान मिनरल्स जगती मिनरल्स सूर्या सेम इस्पात तोपवर्थ मेटल व तालुक्यातील इतर छोट्या मोठ्या कंपनीच्या csr फंड मधून अडेगाव,मुकुटबंन, मंगली ,मार्की, भेडाला,गनेशपुर खड़की खातेरा येडशी व इतर गावामधे सामान्य जनतेला होणारा कोरोना रोखण्यासाठी ठिकठिकाणी हँड वॉश केंद्र व तोंडाला मास्क वाटप करावे असे पत्र  जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या सह सर्व कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *