औरंगाबादच्या नामांतरावर राज ठाकरे म्हणतात ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायला काय हरकत आहे ?’

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौर्याजवर आहे, मनसेच्या नुकत्याच झालेल्या आधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या पक्षाच्या बांधणीसाठी मराठवाडा दौर्यातवर आहे, हिंदुत्वाची भूमिका जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौर्यारकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या दौर्यायदरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधतांना औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केले ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायला काय हरकत आहे ?’ बदल झालेच पाहिजे, अस ते यावेळी म्हणाले.
    औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ व्हावे ही मागणी खूप जुनी आहे. यापूर्वी शिवसेनेने ही मागणी केली होती , आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करत आहे. त्यामुळे नामकरणाचा हा जुना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *