ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी सलामी; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात.

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतला मात्र सलामीलाच पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ऑलिम्पिक पात्रतेच्या श्रीकांतच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.श्रीकांतला ऑलिम्पिक पात्रतेच्या निकषांसाठी जागतिक क्रमवारीत अव्वल १६ मध्ये येण्याची आवश्यकता आहे. मात्र या स्पर्धेत सलामीलाच गारद होण्याची वेळ त्याच्यावर आली. पाचव्या स्थानी असलेल्या चीनच्या चेन लॉँगकडून श्रीकांतला १५-२१, १६-२१ पराभव स्वीकारावा लागला.

भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली

सिंधूने अमेरिकेच्या बिविन झ्ॉँगवर २१-१४, २१-१७ असा विजय मिळवला. सिंधूने पहिला गेम सहज जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये १६-१६ बरोबरी होती.मात्र सिंधू हिने सलग पाच गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. सिंधू आणि बिविन यांच्यातील ही १०वी लढत होती. त्यात सिंधूने सहाव्या विजयाची नोंद केली. याआधी कोरिया बॅडमिंटन स्पर्धेत दोघी आमनेसामने आल्या होत्या. त्यात सिंधूचा पराभव झाला होता. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर कोरियाच्या सुंग जी हुआनचे आव्हान आहे

बैंक ऑफ बड़ौदा भरती २०२०.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *