एमएसएमई आणि व्यवसाय साठी अर्थमंत्र्यांनी केलेल्या ठळक घोषणा.

३ लाख करोड चे विना तारण ऑटोमॅटिक कर्ज मध्य आणि सूक्ष्म लघु उद्योगांसाठी मिळेल

२५ ते ५० करोड बाकी असलेले सर्व उद्योग या साठी पात्र असतील याचा कालावधी ४ वर्षांचा असेल तसेच १२ महिन्याचा हफ्ते भरण्यासाठी अवधी मिळेल १००% गॅरंटी सरकार द्वारे घेतली जाईल. कोणती वेगळी फी किंवा तारण ची गरज नाही. ४५ लाख उद्योगांना याचा फायदा होईल.

२०००० करोड चा फंड स्ट्रेस MSME साठी

सरकारने २०००० करोड रुपयांच्या फंड ची व्यवस्था केली आहे. या मधून २ लाख उद्योगांना फायदा होईल
जे उद्योग चालू आहे पण NPA आहेत असे सर्व उद्योग या साठी पात्र असतील

CGTMSE ला सरकार ४००० करोड देणार
CGTMSE बँक ला मदत करणार जेणे करून उद्योगांना फायदा होईल

५०००० करोड रुपयांची उद्योगांना Equity Infusion मार्फत मदत
या मधून उद्योगांसाठी १०००० करोड ची तरतूद केली आहेया मधून equity फंड दिला जाईल या मधून उद्योगांना वाढण्यासाठी मदत होईल स्टॉक एक्सचेंज वर येण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देईल

MSME च्या नवीन व्याख्या

हे उत्पादन आणि सेवा या दोन्ही साठी लागू असेल
सूक्ष्म
लागत – १ करोड पर्यंत
टर्न ओव्हर – ५ करोड पर्यंत

लघु
लागत – १० करोड पर्यंत
टर्न ओव्हर – ५० करोड पर्यंत

मध्यम
लागत – २० करोड पर्यंत
टर्न ओव्हर – १०० करोड पर्यंत

२०० करोड पर्यंत चे जागतिक टेंडर बंद

या मार्फत भारतीय उद्योगांना सरकारी संस्था चे टेंडर भरता येतील.वया मुळे भारत आत्मनिर्भर होईल

इ मार्केट साठी प्रोत्साहन देणार
सरकार आणि त्या संबंधित सर्व पैसे हे ४५ दिवसांच्या आत मिळतील
२५०० करोड EPF ची मदत उद्योगांना आणि कामगारांना
 पात्र संस्था ना एम्प्लॉइ आणि एम्प्लॉयर चे १२% आणि १२% EPF खात्यावर मिळतील हे मार्क , एप्रिल आणि मे २०२० च्या पगारावर मिळतील तसेच ही मदत आजून ३ महिने जून , जुलै आणि ऑगस्ट पर्यंत वाढवली जाईल

या मार्फत ३.६७ लाख उद्योगांना आणि ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल

EPF चे उद्योगांचे आणि कर्मचारी दोघांचे योगदान ३ महिन्या साठी कमी करणार या मध्ये ६७५० करोड ची तरतूद. या मार्फत ६.५ लाख उद्योगांना आणि ४.३ करोड कर्मचाऱ्यांना फायदा होईल

NBFC/HFCs/MFIs साठी ३५,००० करोड ची तरतूद
४५,००० करोड ची क्रेडिट गॅरंटी २.० सर्व NBFC साठी
कंत्राटदारांना ६ महिन्यांची मुदत दिली जाणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *