उपयोगी गोष्ट…! आता घरबसल्या रेशन कार्ड मध्ये नोंदवा नवीन सदस्याचे नाव.

 केंद्र सरकारने नुकतीच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणीही रेशनकार्ड धारक देशातील कोणत्याही राज्यात रेशन प्राप्त करू शकतो. दारिद्रय रेषेखाली जीवन जगणार्‍या लोकांसाठी रेशन कार्ड एक अत्यावश्यक महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. विशेषकरून लॉकडाऊनमुळे केंद्र सरकार मोठ्याप्रमाणात या कार्डद्वारे धान्य वितरण करत आहे, जेणेकरून कोणीही गरीब उपाशी राहू नये, अशावेळी या कार्डचे महत्व आणखी वाढले आहे. रेशन कार्डमध्ये एखाद्या फॅमिली मेंबरचे नाव टाकायचे राहिले असेल तर ते घर बसल्या कसे अपडेट करता येईल. रेशन कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून अपडेट करता येते.
कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता ? 
१. जर तुम्हाला रेशनकार्डात घरातील एखाद्या मुलाचे नाव टाकायचे असेल तर कुटुंब प्रमुखाचे रेशनकार्ड असणे अनिवार्य आहे. याची एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. याशिवाय मुलाचा जन्म दाखला, आई-वडीलांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
२. जर घरात लग्नानंतर आलेल्या सुनेचे नाव रेशनकार्डात टाकायचे असेल तर यासाठी महिलेचे आधार कार्ड, लग्नाचे प्रमाणपत्र, पतीच्या रेशनकार्डची फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. याशिवाय, माहेरच्या रेशनकार्डमधून नाव कमी केल्याचे प्रमाणपत्र असावे.
घरबसल्या ऑनलाइन अशी अपडेट करा माहिती 

१ रेशनकार्डात कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्यावेळेस या वेबसाईटवर तुम्हाला एक लॉगिन आयडी बनवावा लागेल, जी प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होईल.
२ लॉगिन केल्यानंतर या वेबसाइटच्या होमपेजवर आपल्याला नव्या सदस्याचे नाव टाकण्याचा पर्याय असेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवा फॉर्म ओपन होईल.
३ या फॉर्ममध्ये तुम्हाला कुटुंबाच्या नव्या सदस्यांची पूर्ण खरी माहिती भरावी लागेल.
४ पुढील स्टेपमध्ये या फॉर्मसह सर्व आवश्यक डॉक्युमेंट्सची स्कॅनकॉपीसुद्धा अपलोड करावी लागेल. यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.
५ फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, ज्याद्वारे तुम्ही याच वेबसाईटवर लॉगिन करून फॉर्म ट्रॅक करू शकता.
६ हा फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकारी व्हेरिफाय करतील. जर तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य आहे तर तो फॉर्म एक्सेप्ट करण्यात येईल. आणि पोस्टाद्वारे तुमच्या पत्त्यावर रेशनकर्ड पाठवण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *