उपमुख्यमंत्री मोहदय बारामतीकरांना आवरा, बारामतीत संचारबंदीसाठी तैनात दहा पोलिसांना मारहाण.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन आहे. राज्यात संचारबंदी सुरू आहे या संचार बंदीसाठी पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र आता आपले कर्तव्य बजावत असतांना पोलिसांना मारहाण झाल्याची घटना समोर येत आहे. बारामती तालुक्यातील दोन ठिकाणी संचारबंदीसाठी तैनात पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकार समोर आले आहेत. काल दुपारी बारामती शहरातील जळोची भागात पोलिसांवर काही नागरिकांनी मारहाण केली होती. यात काही कॉरंटाईन नागरिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे तर काटेवाडीत देखील पोलिसांना मारण्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना तालुक्यात मारहाण केल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काटेवाडी हे अजित पवार यांचं गाव म्हणून ओळखले जाते. शहरात दिवसभरात एकूण दहा पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे बारामतीत पोलिसांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.

कोरोनाच्या संकटावर कर्तव्य बजावणार्‍या  पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवरील  हल्ल्याच्या घटना कदापि सहन करणार नाही, असे हल्ले करणार्‍यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाही केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. परंतु त्यांच्या या इशार्यााला त्यांचे बारामतीकरच तोडत  असल्याचे समोर येत आहे. 

कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *