उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा सज्जड दम, ‘घरात राहायचं की हॉस्पिटलमध्ये ठरवा ,आणि जे घरात थांबणार नाही त्यांना डांबणार तुरुंगामध्ये’

सध्या राज्यातील कोरोनाची संख्या चिंता वाढवत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणार्या  प्रयत्नांना यश मिळत नाही आहे त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड दम दिला आहे. ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेने ‘होम क्वारंटाईन’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं. असं आवाहन अजित पवार यांनी केल. तसेच जे लोकं आज घरात थांबणार नाही ते काही दिवसांनी हॉस्पिटल मध्ये दिसतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काही बेजबाबदार नागरिक काही कारण नसतांना देखील रस्त्यावर फिरत आहे. काही न काही कारण सांगून बाहेर फिरू नये कारण जे लोकं विनाकारण बाहेर फिरतांना दिसतील तर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल. आणि त्याची सुरवातही कालपासून झाली आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दूध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. असेही आवाहन त्यांनी केले आहे.

अवघ्या १० दिवसांत ‘त्याने’ कोरोनाला हरविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *