ई-सातबारा आता मिळणार झटपट, काही सेकंदात होणार सातबारा डाऊनलोड.

महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी अभिलेख विभागाच्या वतीने आता राज्यातील सर्व सातबारे ओपन क्लाउडवर घेतले असून यामुळे अवघ्या काही सेंकांदात सातबार डाऊनलोड होण्यास मदत होणार आहे. राज्यात एकूण २ कोटी ५२ लाख सातबारे असून जवळपास ९०% सातबारे ओपन क्लाउडवर डिजीटल स्वाक्षरी सह टाकण्यात आले असून बाकीचे सातबारे टाकण्याचे काम चालू आहे. आता केवळ ३ लाख सातबारा स्वाक्षरीसाठी बाकी आहे. आतापर्यंत केवळ पुण्याच्या एनआयसी च्या संकेतस्थळावर सर्व ई-सातबारे उपलब्ध होते. त्यामुळे सातबारा डाऊनलोड होण्यास खूप वेळ लागत होता. तसेच साइट बंद होणे व हंग होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते.

आता मात्र महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यातील सर्व ई-सातबारे ओपन क्लाउडवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे सातबारा डाऊनलोड करण्यास वेग प्राप्त झाला आहे. यामुळे आता सातबारा काढण्यास जास्त वेळ जाणार नाही. या ओपन क्लाउडवरुन रोज १५ ते २० हजार सातबारे डाऊनलोड होऊ लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *