आम आदमी पार्टी चे ‘ अरविंद केजरीवाल’ यांनी घेतली तिसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आम आदमी पार्टीने सत्ता स्थापन केली व आप चे अरविंद केजरीवाल तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येने दिल्लीकरांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली. अरविंद केजरीवाल यांनी 2013 साली पहिल्यांदा दिल्लीचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2015 मध्ये केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री बनले होते.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बोलतांना अरविंग केजरीवाल म्हणाले की , हा केवळ माझा विजय नसून हा प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे. दिल्लीच्या नागरिकांना आयुष्यात आनंद आणण्यासाठी आम्ही गेले पाच वर्ष प्रयत्न केले, यापुढेही आमचा प्रयत्न चालूच राहणार आहे, गेल्या पाच वर्षात मी सर्वांसाठी काम केले असून कोणालाही वेगळी वागणूक दिली नाही. अजून दिल्लीसाठी अनेक मोठ मोठी कामे कराची असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं. 
अरविंद केजरीवाल यांच्या सोबत घेतली सहा मंत्र्यांनी शपथ     
                                                                                         अरविंद केजरीवाल यांचा सोबत मनीष सिसोदिया ,सतेन्द्र जैन ,गोपाल राय , कैलास गलहोत,  इमरान हुसेन, आणि राजेंद्र गौतम यांनीही मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

‘५० आम आदमी’ ठरले शपथविधी सोहळ्यातील आकर्षण.
                                                                                         अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रण मिळाले होते. मात्र त्यामध्ये 50 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं दिल्लीचा कारभार करतांना गेल्या पाच वर्षात महत्वाचं योगदान देणार्याद विविध क्षेत्रातील ५० जणांना आमंत्रित करण्यात आलं. यामध्ये डॉक्टर,शिक्षक,सफाई कामगार, ऑटो ड्रायवर इत्यादी लोकांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या  चॅनल ला जॉईन करा
घडामोडी महाराष्ट्राच्या – https://t.me/maharashtraupdates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *