आम्ही मदत केली तुम्हीपण करा, भारतीय जनता पार्टी राजुराचे आवाहन.

आज कोविड-१९ संकटाशी सगळं जग लढत आहे. या लढाईत भारत कुठेच कमी पडणार नाही. सपूर्ण जगातील सेवाभावी संस्था तथा व्यक्तीशा रित्या अनेक जण कोरोणा हरेल भारत जिंकेल या आशेने मदत  करित आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय जनता पक्षा राजुरा विधानसभा क्षेत्राच्या वतीने  पदाधिकारी वा नेते मंडळी तथा कार्यकर्ते, कुणीच मागे नाही सेवाभावी वृत्तीने सेवा देत आहेत.आज या राजुरा विधानसभा  क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी पंतप्रधान केअर फंन्डाला २५ हजार रुपयांचा धनादेश कोरोणा ग्रस्ताचे कार्यात मदत म्हणून मा.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल जी खेमणार यांच्या कडे सुपुर्द केला. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे कुषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकडे  होते.

आपणास ही संधी भेटल्यास सहकार्य करावे माणुसकीचा या कार्यात सहकार्य करताना  मनाला खूप आनंद मिळतो त्याचा अनुभवी तुम्हाला ही प्रत्यक्षात येईल असे आवाहन भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *