आमदारांच्या वाहन चालकाला आता शासनाकडून १५ हजार रुपये मानधन मिळणार.

महाविकास आघाडी सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आमदारांच्या विकासनिधीत वाढ करून सर्वांना खुश केले. ठाकरे सरकार आमदारांच्या वाहनचालकालाही दरमहा 15 हजार रुपये वेतन देणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळं आता वाहनचालकांनाही सरकार पगार देणार आहे. आमदारांच्या निधीत एक कोटींनी वाढ होऊन तो आता तीन कोटी झाला आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी तब्बल 6.60 कोटींचा बोजा पडणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडले. सध्या सरकारवर 5.2 कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. यातच आमदारांना भत्ताव्यतिरिक्त 2.3 लाखांचे वेतन मिळते. त्याचबरोबर विधानसभा अधिवेशनात किंवा समितीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी दररोज आमदारांना आणि सभासदांना दोन हजार रुपयांचा भत्ता मिळतो. तसेच, आमदार 25,000 हजार महिन्याच्या पगारावर वैयक्तिक सहाय्यकाला नोकरीवर ठेवू शकतात. आमदारांच्या स्वीय सहायकाला याआधीपासूनच पगार देण्यात येतो. स्वीय सहायकाला दरमहा 15 हजार रुपये पगार मिळत असे, आता त्यात वाढ करून 25 हजार रुपये करण्यात आला आहे.

‘या’ जागांसाठी निघणार राज्यात नोकर्‍यांची मेगाभरती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *