आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत पाम ऑइल सिड चे उत्पादन वाढीवर भर द्यावा, माझी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची मागणी.

देशात पाम ऑईल व पामऑइल  तेलबियांची कमतरता आहे. यामुळे आपल्याला मलेशिया, इंडोनेशीया  सारख्या तेल उत्पादकदेशांकडून मोठ्या प्रमाणात खाद्य तेल व तेलबिया यांची आयात करावी लागते. यात आपली विदेशी  मुद्रा खर्च होते.  देशात मोठ्या प्रमाणात पडीक जमीन उपलब्ध आहे. तसेच देशात काही राज्यांना सुमारे १७००० किमीची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. अशा  राज्यांनी किनारपट्टीवर पाम ऑईल  व पामऑइल तेलबियां चे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेवू शकतात. देशात यापूर्वी सुद्धा पाम ऑईल सिड उत्पादनाचा प्रयोग विषाखापट्टनम येथे केला होता. परंतु तो नियोजनाअभावी पूर्णत्वास गेला नाही.

  दुर्देवाने अनेक राज्यातील मजूर कामगार आपआपल्या राज्यात गेले आहे अशा  मजूरांना मनरेगा सारख्या योजनेतून रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच पाम ऑईल  व पाम

ऑइल तेलबिया क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी पाम आईल सिड च्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मलेशीयाने देशविरोधी कारवाईत संलग्न जाकीर नाईक ला राजकीय शरण दिले आहे. देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणे तथा अशा  देशांच्या आयातीमधून सुटका करुन घेण्यासाठी  पाम ऑईल  व पामऑइल तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण यशस्वी होवू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” संकल्पाला  यशस्वी करण्याचा व रोजगारनिर्मितीचा दुहेरी प्रयत्न सफल करण्यासाठी पाम ऑईल  व पामऑइल तेलबिया उत्पादनाला प्राथमिकता देवून याचा केंद्रसरकारने घोषीत  केलेल्या विस लाख कोटी रुपयाच्या पॅकेज मध्ये समावेश  करावा अशी  मागणी माझी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रिय कृषी , वित्त मंत्र्यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *