आज ‘शिवजयंती’ , सर्व जगात भारी १९ फेब्रुवारी

आज हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराज असे महापुरुष होऊन गेले की त्यांचे पराक्रम, कार्य, विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देतात. आजही जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचायला घेतला तर तो वाचतांना आपल्या अंगावर शाहारे येतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ त्यांचा मोठेपणा नाही तर त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, आणि तेपण अक्षरश: मूठभर सहकार्यांनच्या मदतीने, हा पराक्रम करण्यासाठी त्यांनी केलेले नियोजन, त्यासाठी त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत. ही खरच प्रेरणादायी आहे.
         मध्ययुगात अनेक राजे झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कर्तुत्व कोणीच निर्माण केले नाही. आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत महाराज कमालीचे दक्ष होते. त्यामुळे त्यांच्या राज्यातील जनता ही सुखी व समाधानी होती. महाराजांचे राज्य म्हणजे जनतेचे राज्य होते. त्यामुळेच आजही लोक म्हणतात. ईळा पिळा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे . म्हणूनच त्यांना ‘जाणता राजा’ म्हणून संबोधले जाते. एकच राजा आहे तो जाणतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला.
       छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासकीय धोरणे अतिशय अनुकूल व मानवी होते. शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सुरक्षेतेबद्दल खूप सावध होते. म्हणून आज २१व्या शतकातही शिवाजी महाराजांचा आदर केला जातो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या समाजात रुजून आहे. आजही शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण देशात केली जाते त्याच बरोबर साता समुद्रापार सुद्धा केली जाते. शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगाच्या कानाकोपर्या्त केली जाते. आज शिवाजी महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग आपल्या देशात आहे. पण आज शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. कारण सध्याची परिस्थिती बघितली तर आज हिंगनघाट सारख्या घटना आपल्या राज्यात घडत आहे. आज शिवाजी महाराज असते तर कदाचीत अशी घटना घडली नसती. आज प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना मुलींचा आदर करायचे शिकवले पाहिजे, तेव्हाच अशा घटनांना रोकल्या जाऊ शकते.
 शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणते राजे, युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना आमच्या चांदा टू बांदा टिम कडून  मानाचा मुजरा.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *