आज छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळा,कसा होता शंभुराजे यांचा पराक्रम ?

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/
Instagram:-  https://t.me/chandatobanda

संभाजी राजे यांचा आज राज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी इ.स. १६८१ मध्ये रायगड किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र. तसेच ते स्वराज्याचे पाहिले युवराज व मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. राजे शिवाजी हे निर्विवाद सिंहपुरुष होते. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजल आहे. छावा च्या जोरदार स्वागतान तर हे सिद्ध झाल आहे. मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेले. संभाजी राज्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर सईबाई च्या पोटी १४ मे १६५७ ला झाला. संभाजी राजे अवघे २ वर्षाचे असतांना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईविना पोर सांभाळायची जबाबदारी त्यांच्या आजी, आईसाहेब जिजाऊ  यांनी स्वीकारली.

कसा होता संभाजी राज्यांचा पराक्रम ?

लहानपनापासून संभाजी राजे चातुर्यवाण होते. अनेक भाषा त्यांनी लहानपणीच शिकल्या होत्या. खेळातही ते प्रचंड पटाईत होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी ‘बुधभूषण’
हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहला. संभाजी राजे आपल्या युद्धात गनिमी काव्याचा पुरेपूर करीत होते. त्यांनी याच गनिमी काव्याने औरंजेबास जेरीस आणले होते. आपल्या संपूर्ण कार्यकाळात एकही 
युद्ध न हारलेला एकमेव योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी राजे. त्यांनी लढलेल्या १२०  युद्धापैकी १२० युद्ध जिंकली. त्यांच्या कडे अफाट शक्ति सोबतच चाणक्य बुद्धी होती त्यामुळे ते आपल्या प्रत्येक लढाईत जिंकायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *