आज आहे प्रेरणादायी कवि,लेखक,ओजस्वी वक्ते मा.पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती

चला तर माहिती करून घेऊया कसे होते अटलजींचे जीवन
श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ ला झाला. ते भारताचे १०वे पंतप्रधान होते, ते हिन्दी कवि , पत्रकार व एक प्रखर वक्ता ते भारतीय जन संघातील एक नेता व त्यानंतर भारताचा पंतप्रधान अशी त्यांची जीवनरेषा होती. चार दशके ते संसदेचे सदस्य होते. प्रकृतीमध्ये होणार्‍या वारंवार बिघाडामुळे त्यांनी २००९ मध्ये राजकरणातून निवृती घेतली. आजन्म अविविहित राहिल्यामुळे त्यांना भीष्मपितामहा म्हणून देखील संबोधिले जात होते, त्यांच्या कविता ह्या खूप प्रेयरणादायी आहे. पंतप्रधान असतांना त्यांनी परमाणु चाचणी घेतली गुप्तता खूप मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली होती.संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये हिन्दी मध्ये बोलणारे ते पहिले मंत्री होते
अटलजींच्या काही कविता
·        रग-रग हिंदू मेरा परिचय
·        मृत्यू हा हत्या
·        अमर बलिदान
·        अमर आग है
·        सेक्युलर वाद
·        संसद मै तीन दशक
·        बिन्दु बिन्दु विचार
अटलजींना मिळालेले पुरस्कार
·        पद्मभूषण (१९९२)
·        डी लिट (१९९३)
·        लोकमान्य टिळक पुरस्कार (१९९४)
·        भारतरत्न (२०१५)
या व्यतिरिक्त अन्य भरपूर पुरस्कार अटलजींना मिळाले आहे  
अटलवाणी:-
बाधाए आती है आए
घिरे प्रलय की घोर घटाए
पावो के नीचे अंगारे
सिर पार बरसे यादी ज्वालाए
निज हातो मे हसते-हसते
आग लगाकर जलना होगा
कदम मिला कर चालना होगा  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *