आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले परिचारिकांचे आभार.

दरवर्षी १२ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय नर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. नर्स डे साजरे करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम अमेरिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागातील अधिकारी डोरोथी सदरलँड यांनी मांडला होता.  नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डी.डी.  आयसनहाव्हरने तो साजरा करण्याचे कबूल केले.  हा दिवस १९९५३ मध्ये प्रथम साजरा करण्यात आला.

सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात देशातील नर्स आपले अमूल्य योगदान देत आहे. देशसेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार करत आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त देशातील सर्व परिचारिकांचे व त्यांच्या परिवाराचे आभार मानले आहे. त्यांनी ट्विटर वर ट्विट करून नर्सेस व त्यांच्या परिवाराचे आभार मानले. “२४ तास काम करून आपल्या संपूर्ण जगाला निरोगी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या सर्व परिचारिकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ” तसेच सध्या कोविड-१९ ला पराभूत करण्यासाठी उत्कृष्ठ काम करत असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *