अमेरिकेने चीनला खडसावले,खबरदार भारताच्या सीमेत घुसखोरी कराल तर…..

भारत आणि चीन यांच्याअंतर्गत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. चीनी सैन्याकडून वारंवार भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतानं देखील या घुसखोर्‍यांना चोख प्रतिउत्तर दिल आहे. भारतात चीनी सैंनिकांकडून होणार्‍या घुसखोरीवर व्हाइट हाऊसचे लक्ष असून यावर व्हाइट हाऊस ने नाराजी व्यक्त केली आहे. व्हाइट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की चीन आपल्या शेजारील सर्व देशांवर लष्करी कार्यवाह्या करत आहे. त्यामुळे तो सर्व देशांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसने भारताच्या हद्दीत घुसखोर्‍या न करण्याचा इशारा दिला आहे.

चीनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचे सतत प्रयत्न करत असून यावरून अमेरिका भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. जगभरात चीन सामर्थ्यपूर्ण होण्याच्या होण्याच्या उद्दिष्टाने काम करत असून चीन कोणत्याही देशाला न जुमानता आपली ताकद जगाला दाखवत आहे. त्याचबरोबर दुहेरी शक्तीचा उपयोग देखील करत आहे. असं व्हाइट हाऊसने म्हटलं आहे. परंतु यावर अमेरिकेच्या आरोपात काही तथ्य नसून आम्ही सैन्य शक्ति वापरला विरोध करतो इतर देशांच्या अंतर्गत मुद्दयात आम्ही हस्तक्षेप करत नाही असं स्पष्टीकरण चीन कडून देण्यात आलं आहे.

चीनी घुसखोरीला भारताकडून देण्यात आलेल्या प्रतीउत्तराचं अमेरिकेने समर्थन केले आहे. दक्षिण चीन समुद्रातही अशीच दादागिरी करत असून आपली भूमिका बदलण्याच्या मनस्थितीत नाही. असंही परराष्ट्र मंत्रालयाच्या एलिस वेल्स म्हणाल्या. चीनी सैन्याच्या चिथावखोरीला सामोरे जाण्यासाठी आम्ही भारतसोबत आहो. असंही अमेरिकेने चीनला ठणकावलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *