अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प म्हणतात, ‘टू माय ग्रेट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी… थॅंक्यू फॉर थिस वंडरफूल व्हीसिट’

आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प भारत दौर्यालवर आहे. ते आपल्या कुटुंब, वरिष्ठ मंत्री व अधिकार्यांरचे मंडल यांच्या सह सकाळी 11.30 ला अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल झाले. यावेळी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. 14 तासाचा प्रवास करून ट्रम्प भारतात दाखल झाल्यानंतर विमानतळावरून थेट महात्मा गांधी यांच्या आश्रमाला प्रथम भेट दिली. त्यानंतर संपूर्ण परिसर त्यांनी मोदीसह पाहिला. यावेळी मोदीजींनी महात्मा गांधी आश्रमातील विविध वस्तु आणि आश्रमाची माहिती दिली. तसेच ट्रम्प यांना महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र्य भेट दिले.

    यावेळी ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांच्या आश्रमातील अभिप्राय नोंद वहीत एक संदेश लिहिला त्यात त्यांनी , ‘टू माय ग्रेट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी… थॅंक्यू फॉर थिस वंडरफूल व्हीसिट’ असे लिहिले आहे.  यावेळी ट्रंप  यांनी चरख्यावर सूट कातले.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटला ट्रम्प कडून हिंदीत प्रतिसात म्हणाले, ‘हम रास्ते मे है’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *