अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणतात, ‘अतुल्य भारत’.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप नुकतेच भारत दौर्‍यावर येऊन गेले. भारतात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी भारतसोबत काही करारही केले. त्यानंतर आता ट्रंप हे मायदेशी परतले आहे. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी प्रथमच भारत दौर्यायविषयी भाष्य केले. ते म्हणाले, सध्या भारत आणि अमेरिकेचे संबंध असामान्य स्वरूपाचे आहे. दोन्ही देशातील संबंधमध्ये गेल्या काही वर्षात खूप सुधारणा झाली आहे. भारत हा अतुल्य देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभ्य, शालीन आणि सुसंकृत व्यक्ति आहे.

भारतात आमचे चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले. उत्तम व्यवस्था करण्यात आली, तेथील प्रेमपूर्वक वागणुकीने आम्ही भारावून गेलो. दोन्ही देशाच्या संबंधाच्या दृष्टीने या दौर्यादत खूप काही झाले. असे त्यांनी अमेरिकेतील पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी सांगितले.

                                                       भारतासारख्या सुंदर देशाने ज्या पद्धतीने आमचे स्वागत केले ते पाहून खरचं आम्ही खूप भारावून गेलो, सर्व भारतीयांचे व पंतप्रधान मोदी यांचे आभार असे डोनाल्ट द्रम्प यांची कन्या इवांका ट्रंप यांनी म्हटले.

मनसेची नवीन योजना, ‘ घुसखोरांची माहिती द्या आणि बक्षीस मिळवा ’

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *