अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर गवंडी सुपुत्र झाला तहसिलदार !

काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून तहसीलदार पदी निवड झाली आहे. तुषार यांच्या वडिलांचा छोटा बांधकाम व्यवसाय आहे. त्यातुनच मंदिर कामांच्या कौशल्यातुन त्यांनी तुषार यांचे श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी शिक्षण पुर्ण केले. अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी कधी जिद्दी सोडली नाही. आज ते तहसीलदार झाले यांचा आम्हाला व पुर्ण अळकुटीकरानां अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

सध्या ते कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून चंद्रपूर नगरपरिषद मूल येथे कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना तुषार यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तुषारमधील असणारी हुशारी पाहाता अनेक परीक्षा पास करत ते संध्या. चंद्रपुर याठिकाणी नगरपरिषद मूल येथे कर व प्रशासकीय आधिकरी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीतपणे यश मिळवत ते तहसीलदार पदाचे मानकरी ठरले आहेत.

सातारचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौगुले हा राज्यात पहिला तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके हा मागासवर्गवारीत प्रथम तर अमरावतीची पर्वणी पाटील महिला वर्गवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *