अभिमानास्पद…! जागतिक स्तरावर भारताला मिळालं ‘ हे ‘ मानाचं स्थान.

संपूर्ण जगात कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग ठप्प झाले आहे. त्यात सध्याच्या स्थितीत अत्यंत महत्वाचे कार्य जागतिक आरोग्य संघटना करत आहे. संपूर्ण जगात कोरोनाच्या औषधांसाठी शोध घेतला जात आहे. कोरोनामुळे जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना बाधितांना आकडा एक लाखावर पोहचला आहे. कोरोना विरुद्ध च्या लढ्यात भारत अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे कारण भारताने अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केला.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर भारताने केलेले कार्य व देशांना केलेल्या मदतीचे कौतुक जागतिक स्थरावर होत आहे. त्यामुळे आता भारताला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. येत्या २२ तारखेला ते आपला पदभार स्वीकारणार आहे. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यासाठी मंगळवारी एकमत झाले होते. डॉ. हर्षवर्धन यांची निवड २२ तारखेला होणार असून हे अध्यक्षपद एक वर्षासाठी दिलं जातं. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचे महत्व वाढल्याने भारताला हे पद मिळाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

१ जून पासून धावणार रोज २०० रेल्वे गाड्या, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी घोषणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *