अब की बार बाप –बेटे की सरकार – सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल.

आज संपूर्ण राज्यात भाजपाने धरणे पुकारले आहे. प्रत्येक तहसील कार्यालयासमोर भाजपाने धरणे मांडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय आहे. असा आरोप विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असलेल्या भाजपने केला आहे. मुंबईतील  आझाद मैदानात सभा झाली त्यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘अब की बार बाप –बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार’ अशी जोरदार टीका केली. सोबतच महिलांच्या सुरक्षेतेच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी सरकारला धारेवर धरले. मागील सरकारच्या योजनांची कितीही चौकशी करा काही सापडणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शेर-शायरी मधून सरकारवर टीका.

‘ आज जो हुए मशहूर ,जो कभी कबिल न थे…..
और मंजिल मिली उनको, जो दौड मे शामील न थे …’
असा शेर म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वर जोरदार हल्ला चढवला. सरकारला जागं करण्यासाठी भाजपाचं हे ‘धरणे’ आंदोलन सुरू आहे. हे सरकार म्हणजे वचनभंगाच सरकार आहे. शेतकारांना  फसवणारं सरकार आहे. शेतकर्‍यांच्या  बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार देण्याचे वचन दिले होते त्याचं काय झालं ? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केला. 

कर्जमाफीच्या लाभर्थ्यांनी दिले ‘मुख्यमंत्र्यांना’ लेकीच्या लग्नाचे निमंत्रण॰

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *