अब्दुल कलामांमुळे ‘तो’ ड्रायवर झाला इतिहासाचा प्राध्यापक.

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या एका सल्यामुळे ड्रायवर चक्क इतिहासाचा प्राध्यापक बनला,काथिरेसन अस त्या ड्रायवरच नाव होत. १९८२ मध्ये जेव्हा अब्दुल कलाम हैदराबादच्या डिफेंस अँड रीसर्च लेब्रोरेटरी चे डायरेक्टर होते. त्यावेळी त्यांनी नेहमी एका ड्रायवरला काहीतरी वाचतांना पहिलं ते त्यांच्या जवळ गेले आणि बघितलं की ड्रायवर वर्तमान पत्र आणि इतिहासाचे पुस्तक वाचत होता. कलामांनी त्याला सहज विचारलं हे तू कधी पासून वाचतोस आणि तुला कशामध्ये रस आहे, इतिहासाची आवड सांगून तो ड्रायवर कलामांसोबत बोलू लागला. त्यावर कलाम त्यांना म्हणाले की तू शिकायला हवस,प्रयत्न कर यशस्वी होशील मी तुझा सोबत आहे. त्यानंतर त्या ड्रायवरने मुदराई विद्यापीठात शिक्षण घेण्यास सुरवात केली, आपल्या शिक्षणाकडे लक्ष देता यावे म्हणून त्याने नोकरी देखील सोडली व पूर्ण वेळ आपल्या शिक्षणासाठी देऊ लागला. पुढे त्याने त्याच विद्यापीठातून PHD शिक्षण पूर्ण केल व आता ते अरिंगर सरकारी विद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आज ते याच कॉलेज मध्ये प्राध्यापक आहे. ते म्हणतात की मी प्राध्यापक झाल्यानंतर डॉ अब्दुल कलाम सरांना मला प्रोत्साहन दिल्या बद्दल आभार व्यक्त करन्यासाठी पत्र लिहिलं माझ पत्र वाचून त्यांनी देखील मला एक पत्र पाठवल आणि आजही मी ते पत्र जपून ठेवलं आहे॰

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *