अबब….! बारामतीकरांनी घेतले एकाच दिवशी ३००००००० चे सोने.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सराफा बाजार गेल्या दोन महिन्यांपासून बंद होते. मात्र आता राज्य सरकार कडून काही निर्बंध ठेऊन दुकाने चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळानंतर दोन महिन्यांनी सराफा दुकाने उघडल्याने बारामतीकरांनी खूप गर्दी केली. बारामतीत एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांचं सोनं खरेदी करण्यात आलं आहे.  बारामतीत दुकानं सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

शेअर्समध्ये होणारे कमालीचे चढउतार, बाजारातील मंदीची परिस्थिती, बँकाच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बँकाबाबत निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना तसेच, लग्नसराईचा मोसम यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याचे काही सराफ व्यावसायिकांनी सांगितले. लॉकडाउनमुळे सोन्याच्या विक्रीत प्रचंड घट होईल असे अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र हे संपूर्ण अंदाज बारामतीकरांनी फोल ठरविले आहे. लॉकडाउनमुळे लग्नाची पध्दतच बदलून गेली आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न होऊ लागल्याने इतर सर्व खर्च कमी झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पैसे लोकांनी सोन्यात गुंतविल्याचे बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.

आरोग्य विभागात होणार बंपर भरती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *