अबब…! दारूळ्यांनी अनेक ठिकाणी फोडली दारूची दुकानं.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन चालू आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे दारू पिणार्‍या तळीरामांना आपल्या दारूची सोय कशी होईल याची काळजी लागली आणि त्यांनी सध्या राज्यात चालू असलेल्या संचारबंदीचा फायदा उचलत चक्क दारूची दुकानेच फोडल्याची घटना समोर येत आहे. दारूळ्यांनी आपली तलफ भागविण्यासाठी अनेक दुकाने फोडली असून यातील काही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाल्या आहे.

नागपुरात रोकड ठेवली फक्त दारूच चोरली
रोज दारूची सवय असणार्या  लोकांची लॉकडाउनमुळे मोठी पंचाईत झाली आहे त्यातच नागपुरातील दोन मद्यपींनी एका बारवर डाका टाकत लाखो रुपयांची दारू लंपास केली आहे. बारच्या मागील बाजूची भिंत फोडून दारू चोरण्यात आली. आणि दारू चोरत असतांना त्यांनी इतर किमती वस्तूंकडे दुर्लक्ष केले, त्यांनी बारमध्ये असलेल्या पैशाला सुद्धा त्यांनी हात लावला नाही.

यवतमाळमध्ये ही दुकान फोडले

यवतमाळ मधील झरी येथील बार मध्ये सुद्धा चोरट्यांनी डाका टाकला असून त्यांनी रात्री एक बीयर बार फोडून ३३ हजारांचा माल लंपास केला.

अमरावतीत गोदाम फोडले

अमरावती शहराच्या वलगाव मार्गावरील देशी दारूचे गोदाम चोरट्यांनी फोडले. गोदामाच्या पाठीमागून भिंतीला मोठे भगदाड करून चोरट्यांनी दारूच्या 250 पेट्या लांबवल्या. तब्बल साडे पाच लाखांची देशी दारू चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली

सोलापुरात महागड्या दारुला हातही लावला नाही

सोलापुरातील विजापूर रोड येथील असलेल्या गुलमोहर दारूचे वाईन शॉप फोडत दारूची चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये चोरट्यांनी जवळपास 57 हजार रुपयांची दारू चोरून नेली आहे. विशेष म्हणजे या दुकानात महागड्या दारूच्या बाटल्या देखील होत्या. मात्र या तळीरामांनी महागड्या दारूला हाथ देखील लावला नाही.

सांगलीतही तळीरामांचा कहर

सांगलीत देखील कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळीरामांची मोठी गोची झाली आहे. दारूसाठी व्याकुळ झालेल्या तळीरामांना सांगली आणि मिरजेत थेट बंद असलेली 2 दारूची दुकाने फोडून दारूच्या बाटल्या लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून सांगली जिल्ह्यात सर्व दारू दुकानांना सील ठोकून बंद केलं आहे. कुठेच दारू उपलब्ध होत नाही. त्यामुळे मद्यपींची मोठी गोची झाली आहे. यातूनच सांगली आणि मिरजेत तळीरामांनी थेट देशी दारूची दोन दुकाने फोडली आहेत.

महाराष्ट्रातील उन्हाचा पारा आठवळयाभरात वाढणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *