अबब..! ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी चोरट्यांनी खोदले ‘भुयार’.

देशात चालू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाउनमुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वत्र शांतता पसरली आहे. माणसांची गर्दी असणार्‍या बाजारपेठा आता निर्मनुष्य झाल्या आहे. याचाच फायदा चोरटे घेत आहे.

अंधेरी एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी ज्वेलर्स मध्ये चोरी करण्यासाठी चक्क भुयार खोदून दीड किलो चांदी पळवली आहे. सुनसान वातावरणाचा फायदा घेत चोरट्यांनी ज्वेलर्सच्या मागील बाजूने भुयार खोदून चोरी केली व दुकानातील दीड किलो चांदी पळवली आहे. अंधेरीमधील महेश्वरीनगर मध्ये महावीर ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान असून लॉकडाउन मुळे दुकान बंद ठेवण्यात आले होते. याचाच फायदा घेऊन चोरांनी चोरी केली. दुसर्‍या दिवशी ही घटना लक्षात आल्यानंतर सादर ज्वेलर्स मालकाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. सीसीटीव्ही च्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहे. 

कोरोनाव्हायरस: हा आहे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा अहवाल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *