अबब…! अवघ्या १० मिनिटांत ‘या’ रेल्वेचे संपूर्ण तिकीट बुक.

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे देशातील सर्वच वाहतूक बंद होती. आणि जो जिथे होता तिथेच अटक अडकून राहिला. जवळपास दोन महिन्यापासून बंद असलेली रेल्वे उद्यापासून सुरू होणार आहे त्यासाठी आजपासून तिकीट विक्री सुरू करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  हावडा – दिल्ली या एक्स्प्रेस गाडीची सर्व तिकीटे अवघ्या १० मिनिटांत विकली गेल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.

१२ मे पासून काही मर्यादित रेल्वे मार्गावर रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रवास करणाऱ्या लोकांनी आज तिकीट बुकिंग करण्यासाठी खूप प्रतिसाद दिला. केवळ ऑनलाईन तिकीट मिळत असल्यामुळे लोकांनी IRCTC च्या वेबसाईटवर इतकी गर्दी केली की आयआरसीटीसी साईट काही वेळासाठी अक्षरशा क्रॅश झाली होती. सध्या देशातील काही रेल्वे चालू करण्यात आल्या असून अजून संपूर्ण रेल्वे चालू झाली नाही.
पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील १५ राजधानी मार्गावर  ३० फेऱ्या धावणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *